पुणे शहर

कोथरूड प्रीमीयर लीगमध्ये होणार रंगतदार क्रिकेट सामने ; २६ व २७ मे रोजी आयोजन

पुणे : ४० प्लस क्रिकेट संस्था पुणेच्या वतीने आयोजित कोथरूड प्रीमीयर लीगमध्ये रंगतदार क्रिकेट सामने क्रिकेट शौकीनांना पाहिला मिळणार आहेत. दिनांक २६ व २७ मे रोजी हे सामने वारजे येथील व्हिजन मैदानावर होणार आहेत.

२८ मे रोजी महाराष्ट्रातील ४० प्लस संघांची नॉक पद्धतीने सामने होणार आहेत. प्रथमच कोथरूडमध्ये अशी स्पर्धा आयोजित केली जात आहे, त्यामुळे सर्वांनाच या स्पर्धेविषयी उत्सुकता आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या संघाला ५१ हजार तर व्दितीय क्रमांकाच्या संघाला ३१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. कोथरूड प्रीमीयर लीगसाठी किरण दगडे, पृथ्वीराज सुतार, शंकर केमसे, नवनाथ जाधव, दिलीप वेडे पाटील, राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, दामोदर कुंबरे, हे क्रिकेट संघांचे मालक असणार आहेत.

अधिक माहितीसाठी 8830060703 या क्रमांकावरती संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्पर्धेचे नियोजन उत्तम पद्धतीने केले जात असून कोथरूड प्रीमीयर लीगचे सामने रंगतदार होणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरु आहे.

Img 20220425 wa0010282295230586519690125679
Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये