पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पालखी मुक्काम परिसरातील ७३ टन कचरा हटविला.

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठ आणि नाना पेठ येथील मंदिरांमध्ये असतो. पालख्यांच्या दोन दिवसांच्या मुक्कामात साचलेला ओला आणि सुका असा ७३ टन कचरा पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी हटविला.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पालख्यांचा मुक्काम लक्षात घेऊन महापालिकेने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात साफसफाई साठी ६०० कर्मचारी नेमले होते. या टीमने मंदिर परिसरातील सफाई चोख ठेवली. पालख्या मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या चार तासांमध्ये त्यांनी श्री निवडुंग्या विठोबा मंदिर आणि श्री पालखी विठोबा मंदिर परिसराची स्वच्छता केली.

नाना पेठ, भवानी पेठ, गंज पेठ, घोरपडे पेठ, गणेश पेठ आणि रास्ता पेठ येथे ९० ठिकाणी मंडप टाकून महापालिकेने वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था केली होती. २४ तास पाणी, वीज पुरविण्यात आले आणि पोर्टैबल स्वच्छतागृहाची व्यवस्था ठेवण्यात आली होती. भुताने इंटरनॅशनल या खाजगी कंपनीने महापालिकेला सहकार्य केले. महापालिकेने आरोग्य केंद्रही मोफत उपलब्ध करून दिली. वारकरी महिलांना श्री. नदाफ यांच्यामार्फत सुमारे १५हजार५०० सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले.
महापालिका उप आयुक्त अविनाश सकपाळ, उप आयुक्त संदीप कदम, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे (धुमाळ) यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या सर्व सेवा चोखपणे पुरविण्यात आल्या.









