पुणे शहर

नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयात बैठक,आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पुढाकार

पुणे : नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सातत्याने बैठका घेण्याची मोहीम आमदार शिरोळे यांनी हाती घेतली आहे. त्या मोहीमेत औंध क्षेत्रीय कार्यालयात काल (शुक्रवारी) बैठक घेऊन नागरिकांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे  आणि तपशीलवार चर्चा करणे गरजेचे असते. अशा चर्चांमधून नागरिकांकडूनही काही उपाययोजना सुचविल्या जातात, त्या आधारे तक्रार सोडवणे प्रशासनाला सोपे होते, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

औंध क्षेत्रीय कार्यालयात वार्ड ऑफिसर, क्षेत्रीय अधिकारी यांच्यासमवेत  दिनांक ११ मे २०२३ रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीत मांडण्यात आलेल्या समस्यांचा सविस्तर आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.  

या बैठकीस प्रकाश ढोरे, सुनीताताई वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सचिन वाडेकर,आनंद छाजेड, सचिन मानवतकर, सुप्रीम चोंधे, अनिल भिसे, सौरभ कुंडलिक, मा. संकेत कांबळे, रोहित भिसे, सागर मदने, सुनीताताई निजामपूरकर तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर खलाटे, तसेच नागरिक उपस्थित होते.

Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये