पुणे शहर

पुणे लोकसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस की राष्ट्रवादीचा उमेदवार? अजित पवार म्हणाले…

पुणे : भाजपचे नेते गिरीश बापट यांचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक लागणार असल्याचं बोललं जात आहे. अशात जर ही पोटनिवडणूक झाली तर भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असेल? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल? याची सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे. तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. आमच्या मित्र पक्षांना बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या मित्र पक्षाला शुभेच्छा!, असं अजित पवार म्हणालेत.

यावर पत्रकारांनी या जागेसाठी राष्ट्रवादी इच्छूक आहे का? असा सवाल विचारला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत. आज राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमची ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे १० नगरसेवक होते. जरी चेतन तुपेचा हडपसर मतदारसंघ शिरुरमध्ये येत असला तरी सुनिल टिंगरेचा आमच्याकडे येतो. शहरात दोन आमदार आहेत. खाजगीमध्ये रवींद्र धंगेकरांना पण विचारा. त्याला निवडून आणण्याकरिता सगळ्या आघाडीच्या पक्षांनी सहकार्य केलं.

Img 20230511 wa00027384472977045778543

शरद पवार आणि अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मुख्य कार्यालयाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर शरद पवार आणि अजित पवारांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. शिवाय चार वाजता शरद पवार साखर संकुलला भेट देणार आहेत. अजित पवार यांनी काही वेळाआधी टिम्बर मार्केटला लागलेल्या आगीच्या ठिकाणाची पाहणी केली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

येत्या निवडणुकांवर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीनं लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर अजित पवार बोलले आहेत. कोण म्हणतंय मी इतके उमेदवार उभे करणार. कोण म्हणताय तितके उमेदवार उभे करणार. कोण म्हणतं एकटं उभं राहणार. आता प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं आहे. पण आगामी निवडणुकीबाबत अजून ठरवायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये