राष्ट्रीय

कर्नाटकात 5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात दुपारचे आणि रात्रीचे जेवण; कॉंग्रेस सरकारकडून इंदिरा कँटिन योजना पुन्हा सुरु

बंगळुरू : काँग्रेस सरकारने कर्नाटकात पुन्हा एकदा इंदिरा कँटीन सुरू केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, अल्पभूधारकांना या कॅन्टीनमुळे मदत होणार असून त्यांना ५ रुपयांत नाश्ता आणि १० रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने हे कॅन्टीन पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

इंदिरा कॅन्टीन पूर्वीच्या काँग्रेस सरकारने सुरू केले होते. भाजपची सत्ता आल्यानंतर हे कॅन्टीन बंद करण्यात आले. देशात महागाई वाढत असून खाद्यपदार्थांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर गेले असता त्यांनी काही खाद्यपदार्थ वितरण कर्मचार्‍यांची भेट घेतली. त्यांनी राहुल गांधी यांना कॅन्टीन पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. राहुल गांधींनी पुन्हा कॅन्टीन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

Img 20230511 wa00027384472977045778543


बंगळुरू पालिकेने नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा मेनू तयार केला आहे. इंदिरा कॅन्टीनमध्ये दररोज विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातील. न्याहारीमध्ये उपमा, इडली आणि इतर पदार्थांचा समावेश असेल. त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येते. 175 पैकी 163 कॅन्टीन सुरू आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवत पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केल्यानंतर गरीबांसाठीची ही योजना सुरू झाली आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये