पुणे शहर

पालखी सोहळ्यामुळे वारजेचे वातावरण भक्तीमय ; पंगत सेवेबरोबर आरोग्य सेवाही…

वारजे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे मुक्कामी असल्याने वारजे परिसरातील वातावरणही भक्तीमय झाले आहे. बीड जिल्ह्यातील माकेगाव येथील एकमुखी श्री दत्त मंदिर देवस्थान पंचक्रोशी दिंडी वारजे मुक्कामी असून या दिंडीतील वारकऱ्यांची पंगतसेवा माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

तसेच या दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य सेवा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून करण्यात आली. दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून वारीत लागणारी औषधे यावेळी त्यांना देण्यात आली. या वारकऱ्यांची दोन दिवसाची राहण्याची, जेवण नाष्ट्याची व्यवस्था राजमाता जिजाऊ योगा हॉल, साई सयाजी टॉवर शेजारी, रेणुका नगर वारजे हायवे या ठिकाणी धुमाळ कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. शशिकांत कदम, कोथरूड डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.दीपक पाटील, कार्याध्यक्ष डॉ. ऋषिकेश गार्डी, खजिनदार डॉ. चंद्रकांत बारी, समन्वयक डॉ. अभयकुमार सोनवणे, सदस्य डॉ.तुकाराम राठोड, डॉ. बळीराम महाडिक, डॉ. अश्विनी वाघमारे यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.

दिपाली धुमाळ, बाबा धुमाळ यांच्यासह महादेव गायकवाड, शिवाजी भोईने, दत्ताराम मुकनाक, संतोष बोडदे, अरुण पाटील, पांडुरंग पाटील,यांनी हा उपक्रमाचे संयोजन केले. मुक्कमी असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांकडून सुरू असलेल्या भजन कीर्तनामुळे परिसराचे वातावरण भक्तीमय झाले आहे.

वारकरी परंपरा जपणारे, वारकरी संप्रदायाशी निगडित कार्यक्रम सातत्याने घेणाऱ्या धुमाळ दांपत्याकडून दरवर्षी या उपक्रमाचे संयोजन केले जाते. वारीची तारीख जाहीर झाल्यानंतर बरोबरच्या सहकाऱ्यांना घेऊन या उपक्रमाचे नियोजन केले जाते. सुरेश जाधव, मानसी नलावडे तसेच परिसरातील नागरिकांनी या दिंडीतील वारकऱ्यांना आवश्यक लागणाऱ्या वस्तुरूपात मदत करत या उपक्रमात सहभाग नोंदवला.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682
Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये