महाराष्ट्र

पुणे-मुंबई महामार्गावर केमिकल टँकरचा भडका; 4 जण होरपळून ठार

लोणावळा : पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटातील कुणे पुलावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. केमिकलची वाहतूक करणारा टँकर उलटून त्याने पेट घेतला. टँकरमधील केमिकल रस्त्यावर सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला. त्यामुळे आगीत सापडल्याने दुचाकीवरील १२ वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले.

Fb img 16837376233493064729888638918603

या दुर्घटनेनंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुर्घटनेत टँकर चालकही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. पोलीस आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर कोणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली. त्यामध्ये चार जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. “मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये