पुणे शहर

कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील नाईट लाईफ अखेर बंद ; आभाराचे लागले होर्डिंग्ज

मनसेचे मंदार बलकवडे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकात रात्री बारा नंतर सुरू होऊन पहाटे पर्यंत सुरू राहणारी नाईट लाईफ अखेर पोलीस प्रशासनाला बंद करावी लागली आहे. या नाईट लाईफच्या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने मनसे पदाधिकारी मंदार बलकवडे यांनी ती बंद करावी यासाठी पाठपुरावा केला होता, तर सिंहासन News ने हा विषय लावून धरून प्रशासनावर दबाव निर्माण केला होता. या सर्व पाठपुराव्यामुळे अखेर कर्वे रस्त्यावरील नाईट लाईफचा प्रकार बंद झाला आहे.

रात्रीच्या वेळी सुरू असलेले बेकायदेशीर प्रकार बंद करण्यात आल्याने मंदार बलकवडे यांनी नळ स्टॉप चौकात होर्डिंग्ज लावून अलंकार व डेक्कन पोलीस व वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय तसेच सिंहासन न्यूज यांचे स्थानिक रहिवाशी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आभार मानले आहेत.

गेले काही महिने नळस्टॉप चौकातील नाईट लाईफचा विषय चांगलाच चर्चेत होता. रात्री बारा नंतर चौकात असंख्य स्टॉल लावण्यात यायचे, गाळ्यातील दुकानात काही फूड सेंटर चालू व्हायचे, रात्री ते पहाटे पर्यंत सर्वच या चौकात मिळत असल्याने तरुण तरुणींची गर्दी येथे होत होती. धुरांचे झुरके सोडणारे तरुण तरुणी रात्रीच्या वेळी या ठिकाणी पाहायला मिळत होते. मद्यपींचा जमाव ही या ठिकाणी जमत होता. चौकातच पुलाखाली तळी रामांचे अड्डे तयार झाल्याने याठिकाणी दारू ही मिळत असल्याचे चर्चा सुरू होती. अनुचित प्रकार घडल्याचे काही प्रकार ही पुढे आले होते. मात्र या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात होते. हा सुरू असलेला भयंकर प्रकार थांबावा यासाठी मनसेचे मंदार बलकवडे यांनी पुढाकार घेतला व सिंहासन News ने साथ देत प्रशासनावर या ठिकाणी कारवाई व्हावी यासाठी दबाव निर्माण केला.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30

पाठपुरावा केल्यानंतर सुरवातीला वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने सहाय्यक आयुक्त राजेश गूर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या वेळी कारवाई करत स्टॉल जप्त केले होते. तरीही येथील नाईट लाईफचा प्रकार थांबत नव्हता. रात्रीच्या वेळी कारवाई करण्यात काही अडचणी पालिका प्रशासनाला होत्या. रात्रीच्या वेळी सुरु असणाऱ्या बेकायदा प्रकारावर कारवाई करणे हे पोलीस प्रशासनाचे काम असून तसा पत्रव्यवहारही पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. दंडात्मक कारवाई केली जात आहे असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले असेल तरी हा प्रकार थांबलेला नव्हता.

बलकवडे यांनी याबाबत सातत्याने याबाबत पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकार आता पूर्ण थांबला आहे. ते म्हणाले नळस्टॉप चौकात सुरू असलेला नाईट लाईफचा प्रकार समाजासाठी व स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक होता. रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडून गंभीर घटना घडण्याचा धोका होता. आगोदरच शहरातील वातावरण खराब झाले आहे. वेगवेगळ्या भागात घडणारे प्रकार सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नळस्टॉप चौकात सुरू असणार हा प्रकार बंद व्हावा यासाठी आपण पाठपुरावा केला व त्याला यश मिळाले. हा प्रकार बंद झाल्याने होर्डींग्ज लावून पोलीस व पालिका प्रशासन तसेच सातत्याने याबाबत वृत प्रसिद्ध करणारे सिंहासन न्यूज यांचे आभार मानले असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

Img 20230511 wa0002281296351682306326034196
Img 20230708 wa0003
Img 20230707 wa00097391429386569165714

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये