पुणे शहर

कोथरूडमधून NIA ला हवे असलेले मोस्ट वाँटेड दहशतवादी दीड वर्षांपासून पुण्यात असल्याची पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती

पुणे : दुचाकी चोरी करणाऱ्यांना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर जेव्हा आरोपींची चौकशी सुरू केली तेव्हा धक्कादायक अशी माहिती समोर आली. संबंधित आरोपी हे एनआयएला वाँटेड असणारे दहशतवादी असल्याचं समोर आलं. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली.

Img 20221228 wa00016208176808646242256

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोथरूड पोलिसांच्या नाईट राऊंडमध्ये दुचाकी चोरताना दोन आरोपी सापडले. इम्रान खान आणि मोहम्मद युनुस अशी त्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडे सुरुवातीला चौकशी करताना ते देशातील सगळ्यात मोठी एजन्सी शोधत असलेले आणि तब्बल पाच लाखाचे बक्षीस असलेले दहशतवादी आहेत याची पुसटशी कल्पनासुद्धा पोलिस हवालदार अमोल नजन आणि प्रदीप चव्हाण यांना नव्हती. संशयास्पद हालचालींवरून चौकशी केल्यानतंर धक्कादायक माहिती समोर आली.

Img 20230708 wa0003

चौकशी करत रात्रीच घरझडती घेतली. तसंच त्यांच्याशी संबंधितांचे मोबाईल नंबर या दोघांनी मागितले होते. तेव्हा हे नंबर देताना या संशयित दहशतवाद्यांनी चुकीच्या व्यक्तीची नाव सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पण दिलेले नंबर आणि सांगितलेली नावं फोन लावून पडताळणी करताना काहीतरी गौडबंगाल असल्याच पोलिसांच्या लक्षात आलं. जे नंबर पोलिसांनी डायल केले ते नंबर भलत्याच नावाने नोंद असल्याचे ट्रूकॅालर ॲपवर दिसत होतं.

Img 20230707 wa00097391429386569165714

पोलिसांना ही गोष्ट खटकली आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. आरोपींना कोथरूड पोलीस स्टेशनला आणून एक टीम त्यांच्या कोंढव्यात भाड्याने राहत असलेल्या घरी पाठवली. तिथे पोलिसांना बंदूकीची एक गोळी आणि पिस्तूलाचं कव्हर, एक कुऱ्हाड आणि लॅपटॅाप सापडले. आणखी खोलात चौकशी केल्यावर लॅपटॅाप तपासल्यावर प्रत्येक फाईलला लॅाक असल्याच पोलिसांना लक्षात आलं. एक्सपर्टच्या मदतीने हे लॅाक क्रॅक केल्यानंतर त्यात काही साहित्य सापडले आणि पोलीस चक्रावले.

Img 20230511 wa0002281296351682306326034196

वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आणि एटीएसला पाचारण करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी चौकशीत सहभागी झाल्यावर चक्र वेगाने फिरली आणि हे राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये मार्च २०२२ मध्ये सापडलेल्या स्फोटकाच्या प्रकरणातले फरार आरोपी असल्याचे स्पष्ट केले. दोन साध्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे देशांतल्या सर्वोच्च तपासयंत्रणेला हवे असलेले दहशतवादी कोथरूड व पुणे पोलिसांनी पकडून दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये