पुणे शहर

हैद्राबादहुन आलेल्या ४० नर्सेस पुण्यात दाखल

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सेवा देण्यासाठी हैद्राबाहून आलेल्या ४० नर्सेस पुणे शहरात दाखल झाल्या आहेत. लवकरच त्या जम्बो कोविड रुग्णालयात कर्तव्यास रुजू होणार आहेत. यामुळे जम्बोमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास मोठी मदत होणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल आहे.

जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून तेथील असुविधांबाबत चर्चेत राहिले आहे. आता तेथील परिस्थिती सुधारत असल्याचे आशादायक चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच महापौरांनी जम्बो कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी केलेल्या बदलांची व सुधारलेल्या परिस्थितीची माहिती त्यांनी दिली होती.

आता ४० नर्सेस हैद्राबादहुन आल्या असल्याने जम्बो कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी एक दिलासादायक चित्र आहे. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांबरोबरच नर्सचे ही काम तेवढेच महत्वाचे आहे. या आलेल्या नर्सेस  मुळे जम्बो मधील वैद्यकीय सेवेवरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.   

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये