पुणे शहर

स्मार्ट पुणे तिथे काय उणे….. ठेकेदाराकडून खड्डे बुजविताना दुकानांचे शटर आणि कुलूप बुजविण्याचा अजब कारभार…

कोथरूड मधील घटना; मनसेचा आंदोलनाचा इशारा

पुणे : कोथरूड मधील प्रभाग क्र. १२ मधील आझादनगर कडून वनाझ सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविताना डांबरीकरणाच्या कामात  पुणे महापालिकेच्या पथविभागाकडून नुकतेच खड्डे बुजवण्याकरता डांबरीकरण करण्यात आले होते. माञ या रस्त्यावरील खड्डे बुजवताना ठेकेदाराने अजब पद्धतीचा अवलंब केला असून होते. रस्त्यावरील खड्डे बुजविताना त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांची शटर आणि कुलपे देखील डांबराने बुजवली आहेत.

याबाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांच्यासह गणेश शिंदे आणि सचिन विप्र यांनी याबाबत आवाज उठवित कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचेसहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्याकडे तक्रार केली आहे.

Img 20230721 wa00335630829616667110570

संबंधित काम करताना आपल्या अभियंत्याचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे यातून निष्पन्न होते. कुलपांवर डांबर टाकल्यामुळे संबंधित दुकानदारांना त्यांची दुकाने देखील उघडता येत नाहीत.ही बाब अतिशय लाजिरवाणी असून पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

Img 20230721 wa0027281293027512635838832374

ठेकेदाराच्या या निष्काळपणाबाबत आपण त्याला काही दंड करणार आहोत की नाही किंबहुना आमची मागणी आहे
की, आपण संबंधित ठेकेदाराचे या कामाचे बिल त्वरित थांबवावे आणि यामध्ये जे अधिकारी अथवा ठेकेदार दोषी
असतील त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी.
अन्यथा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्हास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल
याची आपण नोंद घ्यावी. असा इशारा संजय काळे यांनी दिला आहे.

Img 20230721 wa00287888351843542280119
Screenshot 2023 07 17 18 08 38 30
Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196
Img 20221228 wa00016208176808646242256

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये