पुणे शहर

ऑनलाईन भाडेकरारानंतर पोलिस व्हेरिफिकेशनची गरज नाही. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आदेश

पुणे :  घरमालक आणि भाडेकरू यांच्यात ऑनलाईन भाडेकरार झाल्यानंतर घरमालकांना पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन माहिती देण्याची आवश्यकता नाही. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम्स या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन मिळत असल्याने नागरिकांना पोलिस ठाण्यात येऊन माहिती देण्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. याबाबतचे
परिपत्रक यापूर्वीच जारी केले आहे.

भाडेकरार आता कालबाह्य झाले असून, असे करार कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. त्याऐवजी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदवण्यात येणारे ऑनलाईन भाडेकरारच कायदेशीर करण्यात आले आहेत.

Img 20230717 wa0012

पुण्यातील कोथरूड भागातून दोन संशयित दहशतवाद्यांना नुकतेच पकडण्यात आले आहे. हे संशयित दहशतवादी भाड्याने पुण्यात राहत होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी भाडेकरू ठेवल्यानंतर  ऑनलाईन करार करावा पोलिस महासंचालक कार्यालयाने जारी
केलेले परिपत्रक दाखवून ऑनलाईन भाडेकरार केल्यास पोलिसांना स्वतंत्र माहिती देण्याची गरज नसल्याचे पोलिस उपायुक्तांना भेटून कळविले आहे. मात्र, त्याकरिता नागरिकांनी घरभाड्याने देताना कायदेशीर असलेला ऑनलाईन भाडेकरार करणे आवश्यक आहे, असे असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले.

Img 20230511 wa000228129

पडताळणी स्वतंत्रपणे करण्याचे कळविले आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी पोलिस आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला याबाबत पत्र पाठविले आहे. १०० किंवा ५०० रुपयांच्या मुद्रांकावरील मात्र, याबाबत अद्यापही जनजागृती झाली नसल्याने ऑनलाईन भाडेकरार करण्यात आला असतानाही नागरिकांनी त्याबाबतची माहिती प्रत्यक्ष पोलिस ठाण्यामध्ये येऊन देण्याची सक्ती करण्यात येते. याची दखल घेऊन तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके आणि पोलिस महासंचालक कार्यालयातील तत्कालीन उपसहायक श्री. चं. इमडे यांनी याबाबतचे आदेश काढले होते.

Img 20221228 wa0001

त्यानंतर ऑनलाईन भाडेकरार केल्यानंतर प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाऊन माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस विभाग आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यांच्या वतीने ऑनलाईन भाडेकराराची माहिती ही सीसीटीएनएस संगणकप्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या
संगणकप्रणालीमध्ये सिटीझन पोर्टल अंतर्गत
भाडेकरूंची माहिती भरण्याची सुविधा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये