पुणे शहर
सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महिला आघाडीचा रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

पुणे : दरवर्षी प्रमाणे सह्याद्री कुणबी संघ महिला आघाडी पुणे शहराचा रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सनसिटी सिंहगड रोड पुणे अग्निशामक दल येथे जवानांना राखी बांधून यंदाचा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला अग्निशामक दलप्रमूख प्रभाकर उम्राटकर व त्यांचे सहकारी तसेच सह्याद्री कुणबी संघाचे महाराष्ट्र प्रांत सरचिटणीस अजित शिगवण, शहराध्यक्ष सतिश डाकवे, उपाध्यक्ष विठ्ठल नाईक, प्रविण भोज,पुणे शहराध्यक्ष सतिश डाकवे, चिटणीस संतोष रामाणे, महिला आघाडी पुणे कार्याध्यक्षा वैष्णवी भोज, शहराध्यक्षा अंकिता शिगवण, सरचिटणीस प्रज्ञा घडशी तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहर सरचिटणीस छगण भागणे यांनी केले.







