महाराष्ट्र

आरक्षण देण्याचे आश्वासन ते मनोज जरांगेंना आवाहन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतली.   मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. तसेच हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे , असे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  या पत्रकार परिषदेत बैठकीत काय काय आढावा झाला याची माहिती दिली. 

11 हजार 530 जणांना उद्यापासून कुणबी दाखले देणार
न्या शिंदे  समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. तसेच हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे.

Img 20231030 wa00014447190719600278851

मराठा समाजाच्या आरक्षणास संदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची बैठक आता झाली. तपशीलवार चर्चा यामध्ये झाली आहेय. शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे
कॅबिनेटमध्ये स्वीकारून पुढची प्रक्रिया अमही करणार आहोत.

समितीने दोन महिन्यांनी मुदत मागितली आहे. सरकारने दोन महिन्याची मुदत दिली आहे. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे, लवकरात लवकर आपला अंतिम अहवाल सादर करा अस सरकारकडून सांगण्यात आला आहे.

क्युरेटिव्ह पिटीशन यासंदर्भात दाखल केली आहे. यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे.मागास आयोगाला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. इतर संस्था सुद्धा त्यांना मदत करणाप आहेत. क्युरेटिव्ह पिटीशन मधून मराठा समाज मागास आहे ते सिद्ध करता येईल.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

मूळ मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं त्यावर सरकार काम करत आहे. तज्ज्ञ संस्था समितीला मदत करणार आहेत . सुप्रीम कोर्टाने मागे ज्या त्रुटी काढल्या  आहेत त्या दूर करण्यासाठी तीन सदस्यीय तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.

कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्याचा काम आम्ही करू. मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी आणि आपले उपसमिती सदस्य आणि अधिकारी यांच्याशी उद्या चर्चा करणार आहेत.  मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की थोडा वेळ सरकारला दिला पाहिजे.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये