राष्ट्रीय

केरळमध्ये प्रार्थना सभेदरम्यान 3 स्फोट : 1 महिला ठार, 25 जखमी, 5 गंभीर

केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी तीन बॉम्बस्फोट झाले. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलामासेरीमध्ये असलेल्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 9.30 वाजता सुमारे 2 हजार लोक प्रार्थना करत होते, त्यादरम्यान 5 मिनिटांत सलग तीन स्फोट झाले.

केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरचे स्थानिक प्रवक्ते टीए श्रीकुमार यांनी सांगितले की, कन्व्हेन्शन हॉलमध्ये रात्री ९:४५ वाजता तीन स्फोट झाले. प्रार्थना संपल्यानंतर काही सेकंदातच स्फोट झाले. पहिला स्फोट हॉलच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर, हॉलच्या दोन्ही बाजूला आणखी दोन स्फोट झाले. एर्नाकुलममध्ये जिथे स्फोट झाला.

स्फोटाच्या वृत्तानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. शहा यांनी अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. याशिवाय स्फोटाच्या तपासासाठी एनआयए आणि आयबीची टीम पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शहा 28 ऑक्टोबरपासून 3 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांना स्फोटात जखमी झालेल्या लोकांवर योग्य ते उपचार तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. एर्नाकुलममधील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, रजेवर असणाऱ्या डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कलामासेरी मेडिकल कॉलेज, एर्नाकुलम जनरल हॉस्पिटल आणि कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त सुविधा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये