पुणे शहर

40 प्लस पुणे क्रिकेट स्पर्धेत शिवशक्ती, मोरवाडी, सिंहगड संघाने मारली बाजी ; तीन गटात पार पडली स्पर्धा

पुणे: ४० प्लस पुणे क्रिकेट संस्था आयोजित स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून एकूण ६६ संघांनी सहभाग नोंदविला. तीन विभागात सर्व संघांची विभागणी करत पाच दिवस वारजेतील व्हिजन मैदानावर स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन राहुल साठे मित्र परिवार, एस एम व्ही १९९० बॅच, आयडियल स्पोर्ट्स यांनी केले होते.

अ गटात अभिनव जांभूळवाडी संघ विजेता तर शिवशक्ती धनकवडी संघ उपविजेता ठरला. ब गटात मोरवाडी संघ विजेता तर कॅम्प ११ संघ उपविजेता झाला. खुल्या गटात सिंहगड संघ विजेता तर कॅम्प बॉईज संघ उपविजेता ठरला.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

स्पर्धेदरम्यान आरोग्य शिबिर सह्याद्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने घेण्यात आले. तसेच, व्यसनमुक्ती अभियानात खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पुनीत बालन ग्रुप, बढेकर ग्रुपचे विशेष सहकार्य स्पर्धेनिमित्त लाभले.

बक्षीस वितरण समारंभाला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, आयडियल ट्रस्टचे अध्यक्ष वढावकर आणि केतकर उपस्थित होते. पुणे जिल्हा पुणे वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विजय पारगे, सामाजिक कार्यकर्ते बाबा धुमाळ विठ्ठल बराटे, दयानंद इरकल यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Img 20231202 wa00045369394236955842174

स्पर्धेदरम्यान सिनेअभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड उपस्थित राहिले. राहुल साठे मित्र परिवार, एस एम व्ही १९९० बॅच, आयडियल स्पोर्ट्स यांच्या वतीने स्पर्धेचे नियोजनबध्द आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन दीपक मंडले, विनोद चोरघे, शैलेश निवंगुणे, उत्तम सावंत, मेहबूब शेख यांनी केले.

Img 20231111 wa0004281292791598778819580777
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये