कर्वेनगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..

कर्वेनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती कर्वेनगर मधील श्रमिक वसाहत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी २ हजार वह्यांचे मोफत वाटप चिपळूण विधानसभेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले,
यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे आहे. या शुभपर्वाचे औचित्य साधून त्यांच्या महान कार्याबाबत जाणीव जागृती व्हावी यासाठी अखिल कर्वेनगर अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दीय जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करतील याची खात्री आहे.

यावेळी बोलताना आयोजक संतोष वरक म्हणाले,
आपल्या दैदीप्यमान जीवनकार्याने स्त्री जन्माची महानता सिध्द करणार्या, भारताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या प्रजाहितदक्ष न्यायप्रिय राज्यकर्त्या, राजमाता, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाची सार्थकता या महोत्सवातून विशद होणार आहे. हा त्रिशताब्दी महोत्सव साजरा वर्षभर साजरा करण्याचे ठरविले असून विविध कार्यक्रमांची आयोजन केले जाणार आहे.



श्रमिक वसाहत भागांमधील विद्यार्थ्यांसाठी २ हजार वह्यांचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून नक्कीच यापुढे समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे करण्यात येतील. यावेळी योगेश खरात, अशोक कदम, जयवंत कामटे, रुपेश सुतार, सचिन खरात, नितीन खरात, सुनील खरात, दीपक गोरे, मंगेश कोकरे, वैभव खरात, राजेश वरक, प्रशांत शेळके, अजय वरक, साहिल वरक, नंदू चळवदे, निखिल फाटक, रोहित वाघमारे, सागर तेवढे,
बाबू खरात, भगवान शिंदे, विकास माने, सुशांत भिसे, निखिल ननावरे आदी उपस्थित होते.






