पुणे शहर

महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करावी.- अंकिता पाटील

पुणे : महिला सुरक्षा व युवतींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करावी. या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील व व युवक काँग्रेसच्या सरचिटणीस स्नेहल शिवाजी बांगर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेत निवेदन दिले.

यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना विधान गाथा पुस्तक भेट दिले.
जिल्ह्यातील गाय रानाच्या जागेतील घरकुलाचे प्रश्न तसेच महिलांवर होणारे अत्याचार युवतींवर होणारे हल्ले याबाबत कारवाई व उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

युथ कनेक्ट च्या माध्यमातून युवती व महिलां पुढे येणारे समस्या प्रश्न प्राधान्याने मांडले जावेत यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण असल्याचे स्नेहल बांगर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये