पुणे शहर

सुसज्ज प्रसूतिगृहासह होमी भाभा रुग्णालय दीड महिन्यात सुरू होईल-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : महापालिकेच्या होमी भाभा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होत आले असून, येत्या दीड महिन्यात सुसज्ज प्रसूतिगृहासह लोकांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडी आणि परिसरात सर्व सोयींनी युक्त तसेच सर्वसामान्यांना परवडणारे प्रसूतिगृह, बाह्यरुग्ण विभाग व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार महापालिकेने अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या नावाने रुग्णालय उभे करण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी या नात्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्याशी आज (मंगळवारी) चर्चा करून कामाचा आढावा घेतला. येत्या दीड महिन्यात रुग्णालय सुरू होईल, अशी माहिती चर्चेत देण्यात आली. असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

या तीन मजली रुग्णालयात तळ मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर आणि तिसऱ्या मजल्यावर प्रसूतिगृह विभाग असेल. रुग्णालयात प्रसूति आणि उपचार यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाणार आहे. या रुग्णालयामुळे वडारवाडी आणि आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्य सुविधेची सोय होणार आहे.

Img 20240610 wa0014234599511973207107
Fb img 17180177493908840309776594133677
Img 20240610 wa00003121272752325557053
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240607 wa00106155524562941881055
Img 20240607 wa00128459478484949832471
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240606 wa00121276257491443928373

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये