पुणे शहर

सुनेत्रा पवारांची राज्यसभा खासदार पदावर निवडीनंतर पुण्यात स्वागतासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होणार जंगी स्वागत, कार्यालयात जल्लोषाची जोरदार तयारी

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा खासदार पदी निवड झाल्या बद्दल खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आज सायंकाळी पाच वाजता जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. सुनेत्रा पवारांच्या स्वागता साठी आणि जल्लोषासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जंगी तयारी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा वहिनींना राज्यसभेची खासदार पद मिळावे अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मागणी पक्षाने लक्षात घेऊन सुनेत्रा वहिनींना राज्यसभा खासदार पदाची संधी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल आपल्या पुणे शहर कार्यालयात शुक्रवारी जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नारायण पेठेतील शहर कार्यालयात जल्लोष करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत आणि जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती मानकर यांनी दिली आहे.

Fb img 17180177493908840309776594133677
Img 20240610 wa0014234599511973207107
Img 20240610 wa00003121272752325557053
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240607 wa00106155524562941881055
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240404 wa00151639597500999390658
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये