पुणे शहर

कोथरूड मतदार संघ सोडण्याची पक्षाची तयारी मात्र कार्यकर्ते लढण्यावर ठाम ; राष्ट्रवादी (शरद पवार)पक्षाच्या निर्णयावर कार्यकर्त्यांची नाराजी

पुणे :  मविआमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहरातील आठ पैकी सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा दावा करताना कसबा आणि कोथरूडमध्ये निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय कोथरूड मधील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वपूर्ण आणि  महाविकास आघाडीची ताकद असणारा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची ताकद या मतदार संघात जास्त असताना पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

Img 20240404 wa00162092919036315770776

पक्षाने घेतलेल्या या निर्णयानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली असता या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शक्ती जास्त असून ही निवडणूक लढवलीच पाहिजे, असा एकमुखाने निर्णय  घेण्यात आला. यासाठी वेळ पडल्यास जीवाचे रान करू, पण विजयश्री खेचून आणू, अशी आग्रही भूमिका घेत पदाधिकाऱ्यांनी  राज्यसभा खासदाpर वंदना चव्हाण, महाराष्ट्र राज्यातील पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भेट घेतली व पत्र देत आपली भूमिका मांडली.

Img 20240404 wa00127754739105663743070

या भेटीत कोथरूड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षातर्फे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर या दोन नावांची स्थानिक पातळीवर तयारी असून पक्षाचा आदेश अंतिम असणार आहे, असे स्पष्ट केले आहे. या दोंघापैकी एकास संधी उपलब्ध झाल्यास जीवाचे रान करून विजयी गुलाल उधळू, असे भावनिक आवाहन करताना पदाधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवार सुशिक्षित आणि सुसंस्कृत असून शहराच्या विकासासाठी योग्य आहेत, असे सर्वांनी सांगितले.

Img 20240404 wa00132425955639205292116

हा निर्णय एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नसून मविआतील अन्य घटक पक्षांशीही चर्चा होणार असली तरी आघाडीला या मतदारसंघात अनेक वर्षांनंतर विजय मिळवायचा असेल तर ही जागा राष्ट्रवादीला सोडणे फायदेशीर ठरणार आहे असे सर्व पदाधिकारी कार्यकार्त्यांचे ठाम मत मांडले. 

यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी गोविंद थरकुडे, स्वप्नील दुधाने, संदीप बालवडकर, संतोष डोख, किशोर कांबळे, प्रमोद शिंदे, सुषमा सातपुते, गिरीश गुरुनानी, ज्योती सूर्यवंशी, वैभव कोठुळे, सुजाता कसबे, किशोर शेडगे, ऋतुजा देशमुख, योगेश सुतार, अमित गोडांबे आदी उपस्थित होते.

Img 20240610 wa00003121272752325557053
Fb img 17180177493908840309776594133677
Img 20240614 wa00026557655499595144585
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240607 wa00107938737596812460183
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240614 wa00146014913648272342267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये