पुणे शहर

अखिल मौर्य विहार मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा

कोथरुड : अखिल मौर्य विहार मित्र मंडळ कोथरुडच्या वतीने या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला.या वर्षी मंडळाने राम मंदिराचा देखावा सादर केला आहे.गणेश स्थापनेची मिरवणूक भव्य काढण्यात आली होती.या वेळी सोसायटीतील महिला व लहान मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची वेषभूषा केली होती.

दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे.मंडळाचे अध्यक्ष सौरभ बनपट्टे, उपाध्यक्ष वरद संत व खजिनदार अविनाश क्षीरसागर असून गितेश भिलारे,महेश शिंदे, तेजस घोडके, हनुमंत कडलक, विलास इंगवले मंडळाचे आधारस्तंभ आहेत.गणेशविसर्जन मिरवणूक पारंपरिक व शिस्तबद्ध पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सभासद प्रदीप गावडे यानी दिली.

Fb img 16474137314571819310932637888379
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये