पद्मश्री अनुप जलोटा यांची दिवाळी पहाट…पुण्यात प्रथमच दैनिक पुढारीच्या व्यासपीठावर

शुभारंभ लॉन्स, डी. पी.रोड,कर्वेनगर याठिकाणी रंगणार दिवाळी पहाट
पुणे : सुप्रसिध्द गायक अनुप जलोटा हे भारतातील भक्तीसंगीत विश्वातील अढळ तारा असलेल्या अनुप जलोटा या थोर कलाकारास प्रत्यक्ष ऐकण्याची अपूर्व संधी दैनिक पुढारीच्या वतीने पुण्यातील रसिकांना निर्माण झाली आहे. पुण्यातील शुभारंभ लॉन्स, डी. पी.रोड,कर्वेनगर याठिकाणी पद्मश्री अनुप जलोटा यांची दिवाळी पहाट रंगणार आहे.
श्री.जलोटा यांनी सुरुवातीला आपले वडील पुरुषोत्तम दास जलोटा यांच्याकडे गायनाचे धडे गिरवले.गेल्या ५० वर्षात श्री.जलोटा यांच्या मधुर,श्रवणीय गजल,तसेच ९ भाषांतील चित्रपटांसाठी आपला स्वरसाज दिला आहे.मात्र त्यांच्या मधुर, भावभक्तिपूर्ण ऐसी लागी लगन मीरा हो गयी मगन,जग मे सुंदर है दो नाम,रंग दे चुनरिया, मां मै नही माखन खायो, चदरिया झीनी रे झीनी अशा विविध भक्तिस्वरांनी लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.यामुळेच जगभरात ते प्रसिध्द असून त्यांचे लाखो चाहते आहेत.

शनिवार दिनांक २ नोव्हेंबर,२४ रोजी शुभारंभ लॉन्स, डी. पी.रोड,कर्वेनगर,पुणे येथे पहाटे ठीक ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तिकीट बुक करण्यासाठी सोबत असलेल्या डिझाईन मधील किंवा स्वतंत्र दिलेला QR CODE SCAN करून आपले तिकीट आजच बुक करायची आहे.तेव्हा त्वरा करा आणि अनुप जलोटा यांना प्रत्यक्ष ऐकण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या असे आवाहन दैनिक पुढारीचे जाहिरात व्यवस्थापक संतोष धुमाळ यांनी केले आहे.












