पुणे शहर

कोथरूड मधून अमोल बालवडकर आता काय भूमिका घेणार? अमोल बालवडकर म्हणाले…

पुणे : भारतीय जनता पक्षाकडून कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर कोथरूड मधून इच्छुक माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोथरूड चे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र पक्षाकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने अमोल बालवडकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Img 20241020 wa00015243193050905147069

आज अमोल बालवडकर यांनी पत्रकारांना संपर्क साधून आपण लवरकरच भुमिका जाहीर करू अशी माहिती दिली आहे. यामुळे अमोल बालवडकर भारतीय जनता पक्षा विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणार की माघार घेणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

अमोल बालवडकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेना ठाकरे गट त्यांना उमेदवारी देणार की बालवडकर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये