पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन अमोल बालवडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले.

पुणे : कोथरूड मतदार संघातील भाजपाचे इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांचे बंड थांबवले गेले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाई नंतर अमोल बालवडकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी शुभेच्छा पर मुंबई येथे भेट घेतली.

संघटन हीच शक्ती आहे आणि भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांच्या कार्याचा योग्य वेळी योग्य तो सन्मान केल्या जाईल असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संवाद साधताना सांगितले.

Img 20241020 wa0001435697684176070576

यावेळी अमोल बालवडकर यांनी बाणेर बालेवाडी पाषाण कोथरूड परिसरातील नागरिकांच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांचा सत्कार केला.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघ येथून चंद्रकांत दादा पाटील यांना बहुमताने निवडून येण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा शब्द यावेळी अमोल बालवडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0012281298193617916566931378

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये