मी हिंदुत्व आणि धर्मासाठी त्याग केलेला कार्यकर्ता त्यामुळे कोथरूडकर माझ्याच पाठीशी राहतील.- विजय डाकले

महायुतीतील बंडखोर अपक्ष उमेदवार विजय डाकले भाजप विरोधात आक्रमक
पुणे : मी प्रामाणिक हिंदुत्व आणि धर्मासाठी त्याग केलेला कार्यकर्ता असून हिंदू धर्मासाठी अनेक आंदोलनात माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. मी सर्व जातधर्माच्या नागरीकांना सोबत घेऊन सर्व समावेशक धोरण राबवून कोथरूड मतदारसंघाच्या विकासासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझ्या बहुजन समाजातील लोकांच्या आग्रह आणि पाठिंब्यावर मी हि निवडणूक लढवत असून कोथरूड मध्ये भाजपचा पराभव करणारच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विजय डाकले यांनी सांगीतले.
कोथरूड मतदार संघात महायुती तील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (अजित पवार) कडून इच्छूक असलेले विजय डाकले पक्षाकडून संधी न मिळाल्याने बंडखोरी करीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांत पाटील निवडणूक रिंगणात असून महायुती तील बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून विजय डाकले निवडणुकीत येत पाटील यांना आव्हान दिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीचे बंडखोर अपक्ष उमेदवार विजय डाकले सज्ज झाले असून त्यांनी सुरुवातीलाच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
डाकले म्हणाले, मी जरी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत असलो तरी माझ्या जीवनातील बराच काळ हिंदुत्ववादी संघटना असलेल्या पतित पावन मध्ये काम करण्यात गेला आहे. हिंदू धर्मा विरोधात असणाऱ्या अनेक गोष्टींना विरोध करण्यासाठी मी सातत्याने आंदोलने केली आहेत. या आंदोलनातील अनेक गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. हिंदुत्व आणि धर्मासाठी त्याग केलेला कार्यकर्ता आहे.
कोथरूड मतदार संघ कोणाचाही बालेकिल्ला नाही. मी बहुजन समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. भाजपाच्या विरोधात मी कोथरूड मतदार संघातून हि विधानसभा निवडणूक लढवित आहे. मला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. कोथरूड मधील बहुजन समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी मला निवडणूक लढविण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळेच मी निवडणुक लढत आहे. कोथरूड च्या विकासा साठी मला मतदार निवडून देतील. असा विश्वास विजय डाकले यांनी व्यक्त केला आहे.












