पुणे शहर

दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या ! चंद्रकांत पाटील यांच्या मॉर्निंग वॉक संवादात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया..

कोथरूड : ‘दादा आमच्या लक्षात आहे… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!’ ही प्रतिक्रिया आहे; कोथरूड मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची! कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी तात्यासाहेब थोरात उद्यानात जाऊन मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांकडूनही चंद्रकांत पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

Img 20241020 wa0001435697684176070576

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका ॲड. वासंती जाधव, हर्षाली माथवड, भाजपा नेते नवनाथ जाधव, गिरीश भेलके, बाळा टेमकर, अजित जगताप, दिपक पवार यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20240404 wa0016281297658999536660438617

यावेळी भेटणारा प्रत्येक नागरिक दादांना शुभेच्छा देत होता. अनेक नागरिक दादा तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय! तुम्ही कोथरूडच्या घराघरात पोहोचले आहात, अशा प्रतिक्रिया देत होते. यावर चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.  यावेळी त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी सर्वांनी अवश्य मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन केले.

Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये