पुणे शहर

भीमराव तापकीर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार- दीपक मानकर; खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मतदारसंघातील प्रचारयंत्रणा आणि त्याचे नियोजन याचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांना प्रचारदरम्यान येणाऱ्या अडचणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी समजून घेतल्या. बैठकीला उपस्थित असलेले महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्याशी चर्चा करून योग्य प्रचारयंत्रणा राबवून मोठे मताधिक्य मिळवण्याचे उद्धीष्ठ ठेऊन काम करण्याचा निर्धार सर्वांनी केला.

यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे, शंकर (बंडू) केमसे, प्रदीप देशमुख, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, माजी नगरसेवक शैलेश चरवड, दत्तात्रय धनकवडे, बाळासाहेब कापरे, राहुल पोकळे, प्रवीण शिंदे, राजेंद्र पवार, सागर कोल्हे, संतोष फरांदे, सागर भागवत, सुनिता डांगे, भावना पाटील, अमोल भगत, योगेश शेलार, संजय पाटील, देवेंद सुर्यवंशी, बाळासाहेब पारगे उपस्थित होते.

मानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते भीमराव तापकीर यांना खडकवासला मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवून देतील. हि निवडणूक महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष आणि मिञ पक्षांच्या सोबतीने खडकवासला मतदारसंघात जोरदार काम करीत आहेत. या मतदारसंघात महायुती निश्चितच मोठा विजय मिळवेल याचा विश्वास आहे.

Img 20241020 wa0001435697684176070576
Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये