पुणे शहर

कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना  विक्रमी मतांनी विजयी करणार- पतीत पावन संघटनेच्या मेळाव्यात निर्धार..

पतितपावन संघटनेचा भाजपा महायुतीला पाठिंबा

कोथरूड :  पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी केले.कोथरूड मतदारसंघात पतितपावन संघटनेचा स्नेह मेळावा  संपन्न झाला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोथरूड मधून चंद्रकांत पाटील यांना  विक्रमी मतांनी विजयी करणार, असा विश्वास पतितपावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर यांनी व्यक्त केला.

Img 20241020 wa0001435697684176070576

यावेळी भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, भाजप महायुतीचे कोथरूड समन्वयक सुशील मेंगडे, बाळा टेमकर, पतितपावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, शहर पालक मनोज नायर, जालिंदर टेमगिरे, सुनील मराठे, ज्ञानेश्वर साठे, राहुल पडवळ, शरद देशमुख, विनोद बागल, अण्णा बांगर यांच्या सह पतितपावन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

समन्वयक संदीप खर्डेकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपण सर्व गाफील राहिल्याने महाराष्ट्रातील अनेक जागा फारच कमी मतांनी पराभूत व्हावे लागले. मविआ सरकारने अडीच वर्षे हिंदुंना प्रचंड त्रास दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणीही गाफील राहू नये; असे आवाहन त्यांनी केले.

श्रीकांत शिळीमकर म्हणाले की, पतितपावन संघटना नेहमीच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी राहिली आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी महायुतीला पाठिंबा देण्यासोबतच; कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये