‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाच्या शोचे पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी उद्या आयोजन

पुणे : पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने सफाई कामगारांच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित “आता थांबायचे नाय” हा चित्रपट मंगला चित्रपटगृहात मंगळवार दि. २७/५/२०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे. सफाई कामगार व महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व अधिकारी सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे खाते प्रमुख यांनी सफाई कामगारांच्या बरोबर चित्रपट पहावा असे आवाहन युनियनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

या चित्रपटातील सिने अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, पर्ण पेठे यांचा सत्कार मंगला चित्रपट गृहात दुपारी ३.४५ ते ४.२० वा. या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी, चित्रपट व नाट्य दिग्दर्शक शिवाय युनियन निर्मित “कचरा कोंडी” या चित्रपटाचे तसेच “सत्यशोधक” हे नाटक दिग्दर्शित करून महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा व विचारांचा प्रचार व प्रसार करणारे अतुल पेठे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. विशेषतः घनकचरा व्यवस्थापक उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालयाचे उपायुक्त तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त युनियनचे सर्व पदाधिकारी शिवाय ३२६ सफाई कामगार उपस्थित राहून चित्रपट पाहणार आहेत.



तरी या कार्यक्रमास महापालिका आयुक्त तसेच खात्याचे खाते प्रमुख यांनी सफाई कामगारांबरोबर चित्रपट पाहून सफाई कामगारांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी प्रोत्साहन पर सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर, अध्यक्ष कॉ. उदय भट, कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे व जॉईन्ट सेक्रेटरी कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी केले आहे.









