पुणे शहर

“आम्हा चौघांचा एकच संकल्प आहे — कोथरूडचा शाश्वत विकास” -शिवयुतीचे उमेदवार किशोर शिंदे, योगेश मोकाटे यांचा विजयाचा निर्धार…

कोथरूडमध्ये शिवयुतीच्या उमेदवारांची ‘परिवर्तन पदयात्रा’; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या संकल्पना राबवण्याचा निर्धार

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात कोथरूड परिसरात शिवयुतीचे उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे.प्रभाग क्रमांक ३१ मयूर कॉलनी – कोथरूड गाव मध्ये किशोर शिंदे, योगेश मोकाटे, सुप्रिया संजय काळे आणि प्रज्ञा लोणकर–जोशी यांनी ‘परिवर्तन पदयात्रा’ काढली. 

या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी विविध भागांतील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या, अपेक्षा तसेच विकासाच्या संकल्पना जाणून घेतल्या.पदयात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला. नागरिकांकडून मिळालेला प्रेमळ प्रतिसाद आणि आशीर्वाद ऊर्जादायी असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

Img 20251125 wa01782121520512185783132

 “आम्हा चौघांचा एकच संकल्प आहे — कोथरूडचा शाश्वत विकास,” असे त्यांनी म्हटले आहे.शिवयुतीच्या या उमेदवारांनी जनतेचा सक्रिय सहभाग आणि भक्कम पाठिंबा त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवयुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोथरूडसह शहरातील अनेक प्रभागांमध्ये रंगतदार लढत अपेक्षित आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आधारित अशा पदयात्रा आणि कोपरा सभा,जनसंपर्क मोहिमा निवडणुकीला अधिक चुरस निर्माण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये