कोथरुड

कोथरूडमधील एकलव्य कॉलेज येथील रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात..

कोथरूड :  अनेक वर्षांपासून जागेचा ताबा मिळत नसल्याने  एकलव्य कॉलेज येथे हायवेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडले होते. बुधवारी या रस्त्याची ताबा पावती झाल्याने रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा महापालिकेच्या ताब्यात आली. त्यानंतर आज या रस्त्याच्या कामाची भूमिपूजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली.

Img 20250605 wa02771611506215940583891
प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली..

उच्च तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी येथील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी जागा मालक व पालिका प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. शेवटी या पाठपुराव्याला यश मिळाले आणि रस्त्यासाठीची जागा महापालिकेच्या ताब्यात आली.

आज या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जागा मालक पंढरीनाथ बांदल यांच्या हस्ते करून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी यावेळी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, पथ विभागाचे उपअभियंता वाघोलीकर, कनिष्ठ अभियंता बावनकर मॅडम उपस्थित होते. लवकरच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते तसेच प्रभाग 10 मधील चारही माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

मुळात या रस्त्याच्या कामाचे दोन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते मात्र जागा ताब्याचा प्रश्न सुटत नसल्याने रस्त्याचे काम होऊ शकले नव्हते. रस्त्याचे भूमिपूजन होतय पण काम पूर्ण होत नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता.  किरण दगडे पाटील यांनी यात लक्ष घातल्यानंतर आधी रस्त्याच्या ताब्याचा प्रश्न सोडवला त्यासाठी जागा मालक, पालिका प्रशासन यांच्याबरोबर बैठका घेतल्या.. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबतही यावर मार्ग काढण्यासाठी बैठक झाली होती. शेवटी किरण दगडे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि रस्त्यासाठी बाधित असलेली जागा पालिकेच्या ताब्यात आली. जागा ताब्यात आल्याने पुढील आठ दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. रस्त्याच्या कामाला लगेच सुरुवात होणे आवश्यक असल्याने भूमिपूजन समारंभासाठी वेळ घालवत न बसता साध्या स्वरूपात भूमिपूजन घेऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

Img 20250605 wa03096923311012535868657
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये