पुणे शहर

कर्वेनगर मधील गोल्डन पेटल समोरील रस्त्यावर गटारीच्या रात्री नक्की काय घडलं.. राडा आणि जमावाचा गोंधळ

कर्वेनगर : कर्वेनगर मधील गोल्डन पेटल समोरील रस्त्यावर गुरवारी रात्री म्हणजे गटारीच्या रात्री मद्यधुंद असलेल्या तरुणींमध्ये आणि एका कुटुंबामध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाल्याची घटना घडल्याचे पुढे आले आहे. गटारीच्या रात्री झालेला हा राडा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला होता. जमावामध्ये असलेली टवाळखोर पोरं या राड्याचा आनंद घेत जोरजोरन ओरडून, वेगवेगळे आवाज काढून शिट्ट्या वाजवत होती. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाने आजुबाजूच्या सोसायट्यांमधील नागरिकांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

रस्त्यावरून एका दुचाकीवरून जाणाऱ्या तीन तरुणी आणि पायी चालणाऱ्या कुटुंबात शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली आणि वाद एवढा विकोपाला गेला की त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. गटारीची रात्र आणि मद्यधुंद असलेल्या या  तरुणींची आणि त्या कुटुंबाची एकमेकांना गलिच्छ भाषेत दिल्या जात असलेल्या शिव्यांमुळे वातावरण ढवळून निघालं.. भांडत असलेल्या मुली या नशेत असल्याची चर्चा असून साधारण एक तास सुरू असलेल्या या राड्यात बघ्यांच्या गर्दीने रस्ता भरून गेला असताना शेवट पर्यंत पोलिसांची एन्ट्री मात्र झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांना कॉल झाला आहे ते येतील अशी चर्चा गर्दीत होती मात्र पोलिस काय आले नाहीत..

Img 20250508 wa0001235733770892078245

एवढा मोठा राडा होत असताना त्याची खबर वारजे पोलिस स्टेशन किंवा कर्वेनगर पोलिस चौकीला कशी मिळाली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या सुरू असलेल्या राड्याला बघ्यांनी भर घातल्याने वातावरण चिघळले होते. नशेत असलेल्या तरुणी कोणाशीही भांडू लागल्या आणि त्यांना चिडवणाऱ्या पोरांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्याशी हुज्जत घालू लागल्याचे सुत्रांनी सांगितले. धक्का लागल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे गटारीच्या रात्रीचा एक विलक्षण आणि किळस आणणारा अनुभव कर्वेनगर वासियांना अनुभवायला मिळाला.

कामाच्या, शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गावाहून, परराज्यातून आलेले अनेकजण कर्वेनगर मध्ये वास्तव्यास आहेत. त्यातील अनेक जण प्रामाणिकपणे आपल्या कामाशी काम ठेऊन पुढे जात आहे पण काही वाया गेलेल्या पोरा पोरींकडून कर्वेनगरच्या सुरक्षित वातावरणाला काळिमा फासला जात आहे. या संदर्भात आता स्थानिकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये