पुणे शहर

पुणे महापालिका निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर; कोथरूडमध्ये हे महत्त्वाचे बदल पहा A to Z माहिती…

विनायक बेदरकर

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषद घेत हि नवी प्रभाग रचना जाहीर केली आहे. 

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ४० प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय राहणार असून, एकूण सदस्यसंख्या १६५ असेल.

नागरिकांना २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. यापैकी कात्रज – आंबेगाव प्रभाग हा पाच सदस्यीय असणार आहे.

कोथरूड परिसरात हे महत्त्वाचे बदल केले आहेत. 

Img 20250508 wa00018046597267745442111

1.बावधन भुसारी कॉलनी प्रभागाला बावधन बुद्रुक जोडले आहे. आणि परमहंस नगर कट केले आहे. 

2. मयूर कॉलनी प्रभागाला परमहंस नगर भाग जोडला गेला आहे.

3.जून्या दिनानाथ मंगेशकर प्रभागाला डेक्कन जिमखाना भाग प्रभाग क्रमांक 29 ला जोडला आहे. 

पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकुण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 34,81,359 इतकी असुन अनुसूचित जातीची लोकसंख्या 4,68,633 इतकी आहे, व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 40,687 इतकी आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या 165 आहे. एकूण 41 प्रभागांपैकी प्रभाग क्र. 38 हा 5 सदस्यीय असून उर्वरित 40 प्रभाग 4 सदस्यीय आहेत.

प्रारूप प्रभाग रचना संदर्भात नागरिकांच्या हरकती/ सूचना दिनांक 22/08/2025 ते दि. 03/09/2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत व दि. 04/09/2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये व निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येतील.

Img 20250822 wa00205106720898385299666

ward-10.pdf https://share.google/1hLqYn2in2ULyC9FN

ward-11.pdf https://share.google/uY6XtsDJ3LBnIGUFz

ward-30.pdf https://share.google/sw8bZyKAeL2E0Nepe

ward-31.pdf https://share.google/u6W5FlfL3o7jcHZmG

ward-32.pdf https://share.google/6zMXxKMJgxD8KvV6v

ward-33.pdf https://share.google/ANsM73u6s2jIJFpZe

ward-09.pdf https://adc-ecos.enlightcloud.com/1133pmcwebsitev2/s3fs-public/election2025/draftward/ward-09.pdf

बातमी update होत आहे…..

Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये