महाराष्ट्र

पंकजा मुंडेंवर गुन्हा दाखल; मुंडे यांचा ट्वीटद्वारे संताप

बीड:  “परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला आहे. आधी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आता तेच सत्र माझ्यापर्यंत आलं आहे.”पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Advertisement

ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. “गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे,” असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. परंतु अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये