पुणे शहर

पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार १००० ई-बस, प्रक्रियेला गती; केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाला यश 

पुणे : पुणे शहरासाठी आवश्यक असणाऱ्या १००० ई-बसेसच्या विषयासंदर्भात आज केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री  एच. डी. कुमारस्वामी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेत सविस्तर चर्चा केली. १००० बसेसच्या मागणीसंदर्भातील पीएमपीएमएलकडून अपेक्षित असणारा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे दाखल झाला असून याबाबत पुढील प्रक्रिया वेगाने करण्यासंदर्भात कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली.

मोहोळ म्हणाले,पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टीने एकीकडे मेट्रो मार्गांचा आपण विस्तारत करत असताना दुसरीकडे पीएमपीएमएलचे सक्षमीकरण हादेखील आपला प्रमुख अजेंडा आहे. या दृष्टीने या बसेससाठी आवश्यक असणारे पत्र राज्य सरकारने रिझर्व बँकेला प्रस्ताव पाठवावा, याबाबत नुकतीच मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव रिझर्व बँकेला राज्य सरकारकडून पाठवण्यात आले असून या प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून पीएमपीएमएलकडून अधिकृत प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.

Img 20251004 wa0000148917864967549286

पुणे शहराला १००० बसेस मिळण्याच्या दृष्टीने असणाऱ्या प्रक्रियेला आता गती आली असून ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने करण्याचा प्रयत्न आहे. या चर्चेवेळी मा. कुमारस्वामी जी यांनी आपल्या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत पुढील प्रक्रियेसंदर्भात सूचित केले आहे. असेही मोहोळ यांनी सांगितले.

Img 20251013 wa00212544388235458876130
Img 20251008 wa00636567720300341058591

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये