पुणे शहर

सेवावर्धिनीच्या स्वयंसेवकांकडून १००० दिवाळी किटचे पॅकिंग पूर्ण;आदिवासी आणि पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहचविणार….

पुणे : सेवावर्धिनी या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेमार्फत आज आयडियल कॉलनी मैदानावर दिवाळी किट पॅकिंग उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा उद्देश आदिवासी आणि पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवणे हा होता.

या उपक्रमात सुमारे १२० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यात राष्ट्रीय सेविका समिती, कॉर्पोरेट स्वयंसेवक, तसेच सेवावर्धिनीच्या सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देणारे नागरिक सहभागी झाले. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात अवघ्या दुपारी १ वाजेपर्यंत १००० दिवाळी किट्सचे पॅकिंग पूर्ण झाले.

Img 20251004 wa0000148917864967549286

प्रत्येक किटमध्ये सुंदर साडी, दिवे, आकाशकंदील, सुगंधी तेल, साबण, उटणे आणि दिवाळी फराळ यांचा समावेश आहे.

या उपक्रमात दिव्यांग स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येकाला पॅकिंग आणि रॅपिंगची जबाबदारी देण्यात आली होती. कार्यक्रमात खेळ, घोषवाक्ये आणि उत्साही वातावरण होते. शेवटी सर्व स्वयंसेवकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आणि चहा व अल्पोपहाराची व्यवस्था होती.

Img 20251013 wa00212544388235458876130

सेवावर्धिनीचे प्रतिनिधी म्हणाले,सेवावर्धिनीने आतापर्यंत ६०० किट्ससाठी देणगी मिळवली असून आणखी ४०० किट्ससाठी देणगीचे आवाहन केले आहे. एका किटची किंमत ₹७५० असून इच्छुक दाते खालील संकेतस्थळावर देणगी देऊ शकतात- https://www.sevavardhini.org/p/donate-now/

“स्वयंसेवकांचा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद पाहून आम्हाला अभिमान वाटतो. या दिवाळीत आम्ही नाशिक, नंदुरबार, यवतमाळ आणि गडचिरोलीतील आदिवासी कुटुंबांना, तसेच सोलापूर, उस्मानाबाद आणि मराठवाडा भागातील पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी किट वाटप करणार आहोत.”

Img 20251008 wa00636567720300341058591

या उपक्रमातून सेवावर्धिनीने पुन्हा एकदा दाखवून दिले की, एकत्र येऊन समाजासाठी काम केल्यास प्रत्येक घरात प्रकाश आणि आनंद पोहोचवता येतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये