पुणे शहर

कोथरूडमध्ये स्वच्छतेसाठी तत्पर असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करत हर्षवर्धन मानकर यांच्याकडून दिवाळी सरंजाम आणि भेटवस्तूंचे वाटप..

कोथरूड : दिवाळीनिमित्त हनुमाननगर, रामबाग कॉलनी, जय भवानीनगर आणि सुतारदरा येथील आरोग्य कोठीवरील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करत राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्याकडून दिवाळी सरंजाम आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी हर्षवर्धन मानकर म्हणाले, आपल्या परिसराची स्वच्छता, सौंदर्य आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या या स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळेच आपले समाजजीवन सुकर आणि निरोगी राहते. त्यांचा हा समर्पित आणि निःस्वार्थ सेवा भाव खरोखरच कौतुकास्पद आहे.

Img 20250508 wa00011184667503723765598


दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. वर्षभर ऊन, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता हे कर्मचारी आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी हे कर्मचारी तत्पर असतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखत, आपण सर्वांप्रती आदर आणि संवेदनशीलता जोपासावी, या भावनेतून स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे हर्षवर्धन मानकर म्हणाले.

Img 20251004 wa0000148917864967549286
Img 20251013 wa00212544388235458876130

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये