पुणे शहर

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडीची पुरोहितांना मासिक मानधन देण्याची मागणी..

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा पुरोहित आघाडी शिष्टमंडळाने, परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची भेट घेतली व विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. यावेळी महासंघाच्या वतीने पुरोहितांना मासिक मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

Img 20251101 wa01848854473214036819847

यावेळी बैठकीदरम्यान, पुरोहितांच्या काही महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या व त्या सरकार दरबारी मांडण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी हिरवा कंदील दाखवला. पुरोहितांना मासिक मानधन मिळावे, पुण्यात भव्य असे वेदभवन निर्मिती व्हावी व त्याद्वारे वैदिक शिक्षण मिळावे, पुरोहितांसाठी मोफत आरोग्य सेवा किंवा हेल्थ इन्शुरन्स देण्यात यावा अशा मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या.


पुण्यात झालेल्या बैठकीत पुरोहितांच्या विषयावर सुमारे दीड तास सकारात्मक चर्चा झाली, महामंडळाच्या विविध योजनाद्वारे आगामी काळात पुरोहितांना देखील यात लाभार्थी करुन घेण्यात येईल तसेच मुलांच्या देशांतर्गत व परदेशातील उच्च शिक्षणासाठी कर्जरूपी अनुदान, व्याज परतावा देण्याचे ठोस आश्वासन या बैठकीत देण्यात आले.

Img 20250508 wa00011184667503723765598

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील पुरोहित गुरुजी, वेदपाठशाला, वेदभवन, शिकणारे विद्यार्थी, अध्यात्मक, प्रवचनकार, कीर्तनकार यांचे संघटन अभियान राबवण्यात येणार आहे. त्याचा लाभ समस्त ब्राह्मण पूरोहित वर्गाला होईल याची खात्री वाटते. आतापर्यंत सुमारे 160 पेक्षा जास्त पुरोहितांना नियुक्ती पत्रके देण्यात आली आहेत व या सर्वांची एक जिल्हास्तरीय बैठक घेण्यात येणार आहे असे मंदार रेडे यांनी सांगितले.

आजच्या या शिष्टमंडळामध्ये, पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, पुरोहित आघाडी अध्यक्ष संतोष वैद्य, उपाध्यक्ष राहुल भाले शास्त्री, सरचिटणीस मनीष जोशी गुरुजी, संपर्क प्रमुख उमेश जोशी, पुरोहित महिला संपर्क प्रमुख सौ. सुरेखा ताई जोशी, श्रीपाद काशीकर, अतुल जोशी, किशोर जोशी गुरुजी उपस्थित होते.

Fb img 17575688025518630244243602003405

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये