वारजेत भाजपला धक्का ; माजी नगरसेवक किरण बारटक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर..

प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलरनगर
अमोल साबळे
वारजे : वारजे पॉप्युलर नगर प्रभाग क्रमांक ३२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. या प्रभागात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवकांचा प्रवेश घेत आपल्या पक्षात घेतल्याने पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या प्रभागातून भाजपकडून इच्छुक असलेले माजी नगरसेवक व भाजप पुणे शहर उपाध्यक्ष किरण बारटक्के यांना डावलण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांना मध्ये नाराजीचा सूर आहे. आज नाराज किरण बारटक्के काय निर्णय घेण्यात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. किरण बारटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मजबूत होणार आहे.

वारजेतील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सायली वांजळे, तसेच दिलीप बराटे यांचे पुतणे भारतभूषण बराटे यांचा भाजप प्रवेश करून घेतला आहे. त्यांची उमेदवारीही निश्चित झाली आहे. परंतु राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप जिवंत ठेवण्याचं काम ज्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अन्याय करण्यात आला असून या प्रकारामुळे भाजप गोटात नाराजीचा सूर आहे.
उमेदवारीसाठी डावलण्यात आल्याने माजी नगरसेवक व भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष किरण बारटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली आहे. किरण बारटक्के यांचा राष्ट्रवादीचा निर्णय भाजपला धक्का ठरू शकतो. ही वारजेतील भाजपच्या मनसुब्यांना छेद देण्यासाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी असणार आहे. किरण बारटक्के या भागातून नगरसेवक राहिलेले आहेत. प्रत्येक भागात त्यांचा दांडगा संपर्क आहे. सातत्याने ते समाजपयोगी उपक्रम राबवत आलेले आहेत. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे सचिन बराटे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादीचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ या प्रभागात तगडा पॅनल बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते स्वतः व त्यांच्या पत्नी दीपाली धुमाळ या प्रभागात नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे एक चांगला पॅनल राष्ट्रवादीचा या ठिकाणी पाहिला मिळू शकतो.






