भाजपने तिकीट नाकारले अमोल बालवडकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी

भाजपला कार्यकर्ता काय असतो ते दाखवून देईन- अमोल बालवडकर
पुणे : पुणे महापालिका निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या घडामोड होत आहे.भाजपाने तिकीट नाकारल्या नंतर अमोल बालवडकर यांना आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
अमोल बालवडकर म्हणाले, विधानसभेला मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यावेळी पक्षातील नेत्यांनी माझ्या घरी येऊन मला झाले, गेले विसरून काम करा असे सांगितले होते. त्यावेळी मी सर्व विसरून चंद्रकांत पाटील यांचे काम केले आणि माझ्या भागात मताधिक्य मिळवून दिले. मात्र आज अखेरच्या क्षणी माझी उमेदवारी डावलण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे उमेदवारी मागणे मला भोवले आणि माझे तिकिट कापले गेले.

अखेरच्या क्षणी हे सर्व घडले. त्यामूळे मी अजित पवार यांची भेट घेऊन संवाद साधला. त्यावेळी अजित पवारांनी माझ्यावर विश्वास टाकत मला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे.माझ्या कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावरती विश्वास टाकला तर सार्थ ठरवेल .तसेच हुकूमशाही चालत नाही कुठलाही पक्ष मोठा व्हावा मात्र पाय जमिनीवर ठेवावेत.अमोल बालवडकर आता दाखवून देईल की भाजपाला कार्यकर्ता काय असतो. भाजपाला या निवडणुकीत धोबीपछाड देणार याला वचपा नाही याला धोका देणे म्हणतात. अमोल बालवडकर यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना सांगितले



