नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध- हर्षवर्धन दीपक मानकर

स्थानिक प्रश्नांवर किष्किंधानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची कोपरा सभा
पुणे : पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनेलचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर (गट अ), तृप्ती निलेश शिंदे (गट ब) व कांता नवनाथ खिलारे (गट क) यांच्या उपस्थितीत किष्किंधानगर येथील सुदर्शन मित्र मंडळ येथे कोपरा सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी नागरिकांनी सर्व उमेदवारांचे दिमाखात स्वागत केले.
उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित विविध समस्या मांडण्यात आल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे सर्व उमेदवारांनी आश्वासन दिले.

यावेळी हर्षवर्धन दीपक मानकर म्हणाले,“किष्किंधानगर परिसराचा सर्वांगीण विकास, नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे.” नागरिकांनीही आपल्या समस्या मांडत विकासासाठी सकारात्मक प्रतिसाद देत या वेळी आपापल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. पिण्याच्या पाण्याची अडचण, खराब रस्ते, अपुरी स्वच्छता,सार्वजनिक शौचालयांची गरज, स्ट्रीट लाईट्स ,सीसीटीव्ही बसविणे, महिला व युवा वर्गासाठी रोजगार उपलब्ध करणे, शैक्षणिक सुविधा मिळणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधा याबाबत नागरिकांनी उमेदवारांचे लक्ष वेधले. उमेदवारांनी सर्व प्रश्नांची दखल घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या कोपरा सभेला किष्किंधानगर परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नागरिक, सुदर्शन मित्र मंडळाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत नागरिकांमध्ये विश्वास व पाठिंबा अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.



