पुणे शहर

भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर सह निवडणूक प्रमुख पदी दीपक पोटे यांची नियुक्ती 

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर सह निवडणूक प्रमुख पदी दीपक पोटे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी जाहीर केले आहे.

माजी नगरसेवक दीपक पोटे गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत असून संघटनात्मक कामामध्ये छोटा कार्यकर्ता ते भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष, नगरसेवक भाजपा शहर सरचिटणीस ,लोकसभा निवडणुकीचा सहसंयोजक आणि कोथरूड विधानसभेच्या निवडणुकीच्या विविध जबाबदारी पार पाडलेल्या आहेत.असा त्यांना अनुभव आहे. या महापालिका निवडणूकीत दीपक पोटे यांना भाजपने उमेदवारी नाकारली परंतू त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे.

भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील निवडणूक व्यवस्थापन अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि परिणामकारक करण्यासाठी अनुभवी व विश्वासार्ह नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पष्ट उद्दिष्ट, नियोजनबद्ध कामकाज आणि समन्वयातून कार्य करणारी संघटनात्मक रचना उभारून प्रत्येक प्रभागापर्यंत भाजपची ताकद पोहोचवण्याचा हा ठाम संकल्प आहे. ही नियुक्ती म्हणजे केवळ जबाबदारीचे वाटप नाही, तर विजयाच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल आहे.

Img 20251125 wa01782121520512185783132

दीपक पोटे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे. ती मी पूर्ण ताकदीने पार पाडणार आहे. माझा संघटनात्मक कामातील अनुभव पाहून मला शहरातील पक्षाची निवडणूक यंत्रणा सबंधित जबाबदारी मला दिली आहे. पुण्याचा महापौर भारतीय जनता पक्षाचाच होणार असून शहरात जास्तीत जास्त नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील यासाठीच मी प्रयत्न करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये