कोथरुड

आम्ही जनतेसाठी 24×7 उपलब्ध आहोत आणि राहणार..कामाच्या जोरावर जनता आमच्या पाठीशी उभी राहील : प्रभाग 10 भुसारी कॉलनी बावधन मधील भाजप उमेदवारांना विश्वास

कोथरूड : – प्रभाग १० भुसारी कॉलनी बावधन मधील नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही २४x७ उपलब्ध होतो, आहे आणि यापुढेही राहणार आहोत, आम्ही केलेली विकास कामे, अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांची केलेली सोडवणूक यामुळे प्रभागातील जनता आमच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास भाजपच्या उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला.

भाजपच्या उमेदवारांचा प्रभागात प्रचारकाचा धडाका सुरू असून  भाजपाचे उमेदवार किरण दगडे पाटील, अल्पना गणेश वरपे, रुपाली सचिन पवार, दिलीप वेडेपाटील हे केलेली विकास कामे आणि सुरू असलेले लोकोपयोगी प्रोजेक्टचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत.

उमेदवारांनी महात्मा सोसायटी, सारथी शिल्प, मंगलधाम सोसायटी, वृंदावन, रोहन गार्डन, हरिप्लाझा, कुंबरे पार्क, हील व्हिव, जिजाई नगरी, मौर्य विहार आदी परिसरातील सोसायट्यांना भेटी देत  नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटी दरम्यान नागरिकांच्या मनातील अपेक्षित विकासावर चर्चा करून नागरिकांचे म्हणणे उमेदवारांनी ऐकूण घेतले.

या दौऱ्यात अनेक वर्षापासून डिपी रस्त्यावरील रखडलेल्या एकलव्य कॉलेज जवळील रस्ता, मौर्य विहार रस्ता, हायवे ते महात्मा सोसायटी जोडणारा रस्ता, आशिष गार्डन ते शांतीबन चौक या रस्त्यांच्या प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.  आगामी काळात नागरिकांना आवश्यक प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच नागरी सुविधा नियोजनपूर्वक पुरवण्यावर आमचा भर राहिल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

Img 20251125 wa01782121520512185783132

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये