बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगे प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबध्द- अमोल बालवडकर

सुस परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूकीत रंगत निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, गायत्री मेढे–कोकाटे, पार्वती निम्हण यांच्या सुस येथे भव्य पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भगवती नगर ते भैरवनाथ मंदिरपर्यंत फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि मोठ्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
भगवती नगर ते भैरवनाथ मंदिरापर्यंतच्या या पदयात्रेत फुलांचा वर्षाव, जोरदार घोषणाबाजी आणि मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला. संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे हि पदयात्रा प्रभावी ठरत आहे.

या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला आणि स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांबाबत चर्चा केली. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पदयात्रेचे स्वागत केले आणि प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला.अमोल बालवडकर यांनी नागरिकांच्या या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आभार मानले आणि म्हणाले, “हा उत्साह पाहून आम्हाला अधिक जबाबदारीची जाणीव होते. प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.



