पुणे शहर

मतदारयाद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षणासंदर्भात कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बैठकीचे आयोजन…

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत आगामी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याबाबत सखोल आढावा घेण्यात आला.

यावेळी नगरसेवक हर्षवर्धन मानकर, नगरसेवक स्वप्निल दुधाने,  शुभम माताळे,  निलेश शिंदे, नवनाथ खिलारे, धनंजय पायगुडे, संगीताताई बराटे, कांताताई खिलारे, श्रीकांत बालगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20260222 wa00065926623401269940689

हर्षवर्धन मानकर म्हणाले, या बैठकीत (SIR) पुनर्निरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदार याद्यांचे अचूक, पारदर्शक व सर्वसमावेशक पुनर्निरीक्षण प्रभावीपणे राबविण्यासाठी ठोस यंत्रणा उभी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक प्रभागात जबाबदाऱ्या निश्चित करून कार्यपद्धती अधिक शिस्तबद्ध व परिणामकारक करण्याचे निर्देश देण्यात आले.

मतदार नोंदणी प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित व्हावा, या दृष्टीने संघटनेच्या एकत्रित प्रयत्नांतून कार्यवाही करण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. असेही मानकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये