पुणे शहर

विषारी घोणस सर्प दंशाने नांदोशी येथील शेतकऱ्याचा मृत्यू; सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज अपयशी; परिसरात हळहळ

पुणे: शेतात काम करत असताना विषारी घोणस सर्पाने दंश केल्याने नांदोशी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महादेव किसन शेलार (वय अंदाजे 60) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या महादेव शेलार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

1 मे रोजी महादेव शेलार हे आपल्या शेतात काम करत होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना अति विषारी घोणस सापाने दंश केला. धाडसी असलेल्या महादेव शेलार यांनी न घाबरता सापाला मारले व घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी सापाने दंश केल्याचे व सापाला मारुन बांधावर टाकल्याचे सांगितले.

Img 20260222 wa00065926623401269940689

घरातील व्यक्तींनी त्यांना तातडीने उपचारांसाठी हलवले. दवाखान्यात नेत असताना अर्ध्या रस्त्यात शेलार पूर्ण बेशुद्ध झाले. अगोदर किरकटवाडी येथील खासगी रुग्णालयात व तेथून तातडीने ससून येथे नेण्यात आले. सापाची ओळख पटलेली असल्याने लगेच उपचार सुरू करण्यात आले मात्र अत्यंत मोठ्या विषारी घोणस सापाने दंश केलेला असल्याने उपचार उपयोगी ठरले नाहीत. सात दिवसांनंतर आज शेलार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये