श्रीमान योगी प्रतिष्ठान च्या वतीने बालमित्रांना ‘आत्मनिर्भर’ आणि ‘स्वदेशी’ चे धडे

पुणे : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा, खेळांची मैदाने बंद असल्याने श्रीमान योगी प्रतिष्ठान च्या वतीने बालमित्रांना आत्मनिर्भर आणि स्वदेशीची ओळख होण्यासाठी पणत्या व आकाशदिवे सजावटीचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे श्रीमान योगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.
याप्रसंगी कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, परिसरातील नागरिक, श्रीमान योगी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून बालमित्रांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, खेळांची मैदाने सुरक्षेच्या कारणास्तव बंद असल्याने त्यांच्यासाठी काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने तसेच बालपणीच मुलांना आत्मनिर्भर आणि स्वदेशी वापराचे महत्व समजावे आणि काही तरी नवीन शिकता यावे यासाठी श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड येथील ऋतुरंग सोसायटीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला बालमित्रांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

दुष्यंत मोहोळ म्हणाले की, ‘श्रीमान योगी प्रतिष्ठान मार्फत बालमित्रांना पणत्या व आकाशदिव्याचे सर्व साहित्य उपलब्ध करून देऊन, त्यांना संबधित विषयातील तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बालमित्रांनी आनंद घेत, वेगवेगळ्या प्रकारचे पणत्या व आकाशदिवे बनविले. खुप दिवसांनी काही तरी नवीन शिकायला भेटल्याचा आनंद बालमित्रांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहर्यावर जाणवत होता.’
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम घेण्यात आला आहे. तरी पुढील काही दिवसात असेच उपक्रम कोथरूड मधील सोसायटी मध्ये घेतले जाणार आहेत’ अशी माहिती दुष्यंत मोहोळ यांनी दिली.






