उद्योग

एकीकडे सरकार म्हणते मेक इन महाराष्ट्र आणि दुसरीकडे उद्योगांना संरक्षणच नाही.

उद्योगांच्या मूलभूत सुविधांकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष ; फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात

पुणे : एमआयडीसी उद्योगांना जागा देते, मात्र त्यांच्या मूलभूत सुविधांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. एकीकडे सरकार म्हणते मेक इन महाराष्ट्र, नवीन उद्योग उभे करा. परंतु आहे त्या उद्योगांना सरकार कडून संरक्षण मिळत नसल्याची कैफियत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने आज एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे यांच्यासमोर मांडली.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभय भोर पुणे जिल्हा उपाध्यक्ष उद्योजक संजय भोर आणि अनेक  उद्योजकांच्या उपस्थितीत आज औद्योगिक परिसराला भेडसावणाऱ्या समस्या बाबत एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे यांच्याकडे  निवेदन देण्यात आले.

IMG 20201024 WA0166

यावेळी औद्योगिक परिसराला भेडसावणाऱ्या समस्या बाबत तुपे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात उद्योजकांचे मोलाचे योगदान आहे. असे असताना महानगरपालिका कायम उद्योगी क्षेत्राबाबत दुजाभाव करताना दिसते. एम आय डी सी मार्फत उद्योग क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कर महानगरपालिका घेते परंतु त्या बदल्यात उद्योजकांना कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही. उलट आमची ती जबाबदारी नाही असे सांगून अधिकारी काढता पाय घेत असल्याचे यावेळी असोसिएशनकडून सांगण्यात आले.

IMG 20201028 WA0145

आज औद्योगिक परिसरात रस्ता, लाईट, ड्रेनेज, बस स्टॉप, कचरा प्रश्न, अतिक्रमणे असे अनेक प्रश्न प्रलंबित कित्येक वर्षापासून आहेत. त्यामुळे येथील उद्योजक त्रासलेल्या परिस्थितीमध्ये दिवस काढत आहेत. आणि या सुविधा मिळविण्यासाठी खाजगी ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात पैसा द्यावा लागतो. हीच परिस्थिती राहिल्यास पिंपरी-चिंचवड मधून उद्योगक्षेत्र स्थलांतरित झाल्याशिवाय राहणार नाही.
यावर योग्य ती उपाययोजना करून एमआयडीसी आणि महानगरपालिका यांनी समन्वय साधत उद्योजकांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली.

समस्या सुटल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येतील असा इशारा असोसिएशन च्या वतीने देण्यात आला आहे.  यावेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उद्योजक अभय भोर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष उद्योजक संजय भोर, विकास डफळ, पुणे शहर उपाध्यक्ष मोहन बागमार, सुनील बुट्टे पाटील, नितीन नेने, उद्योजक हरिभाऊ भोकरे व अनेक उद्योजक उपस्थित होते.  मुख्य अभियंता सुभाष तुपे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि मुंबई एमआयडीसी ऑफिस यांच्याशी समन्वय साधून लवकरात लवकर उद्योजकांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.

Tags
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close