पुणे शहर

पालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन

कोथरूड : शिवेसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या वतीने व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या सहकार्याने महापालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पालिका कर्मचारी वर्षभर रात्रं-दिवस जनतेची सेवा करीत असतात. आपल्या सर्वांना त्यांनी वर्षभर कामासाठी केलेल्या सहकार्याची आठवण म्हणून अशा या कौटुंबिक दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन सुतार यांच्याकडून दरवर्षी करण्यात येत असते. 

Screenshot 2020 11 19 15 35 04 47

यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन संकटामध्ये या सर्व विविध विभागांच्या कोविड योध्यांनी आपले सेवा-कार्य बजावून समाजाला सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य पार पाडले, त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने फराळ व ड्रायफ्रूट बॉक्सचे वाटप यावेळी करण्यात आले.  या प्रसंगी मनपाच्या आरोग्य, कीटक, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत, अतिक्रमण, उद्यान, भवन, गवनी, श्वानपथक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Img 20201114 wa0195

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मराज सुतार, शिवराज सुतार, सुधीर वरघडे, गजानन सातपुते, सुमित माथवड, जितेंद्र खुंटे, अनिल भगत, महेश चव्हाण, योगेश चौधरी, संजय घारमाळकर, सुरज अवधुत, संजय डाळिंबकर, आप्पा वाघ, योगेश क्षीरसागर, निलेश मिस्त्री, भूषण माथवड, प्रसाद नारकर, दत्ता गोयेकर, सुंदर खुडे, अभिजीत चव्हाण, अशोक चंदनकेरी, शशिकांत नाकते यांनी सहकार्य केले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये